केज दि.६ – येथे दोन दिवसांपूर्वी पारधी समाजाच्या दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणातील दोन्ही गटातील आठ आरोपीना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आणखी दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, दि. ४ जून रोजी केज येथील मुख्य रस्त्या लगत सायंकाळी ५:०० सुमारास पूर्वीचे जुने भांडण आपसांत मिटविण्याच्या कारणावरून पारधी समाजाची बैठक बोलावली होती. त्यात हेव्यादाव्यावरून त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यात चार मोटरसायकलींचे देखील नुकसान झाले आहे. भांडणात दगड, काठी, कोयता व तलवारीने मारहाण झाल्याच्या परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. या भांडणातील परस्पर विरोधी तक्रारी वरून एकूण वीस आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील सुरेश बाबू काळे, दीपक खंडू काळे, आकाश बापू काळे, बालाजी खंडू काळे, राहुल उत्तम शिंदे, राजगुरू अच्युत काळे, लालू उर्फ लालासाहेब अच्युत काळे, आप्पा उर्फ सूर्यनारायण मुरलीधर काळे यांना पोलिसांनी अटक करून त्यांना केज न्यायालयाचे मा. प्रथमवर्ग न्यायाधीशा समोर हजर केले असता या आठ आरोपीना दि. ८ जून पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान आज दि.६ जून रोजी याच गुन्ह्यातील आणखी सुरेश बंकट काळे आणि बबलू उत्तम काळे या दोन आरोपीना अटक करण्यात आली आहे. अन्य चार आरोपी हे दवाखान्यात उपचार घेत आहेत. या परस्पर विरोधी तक्रारींचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर हे करीत आहेत.
—————————————————–