व्हायरल

केज येथे रस्त्यावर मृतदेह आढळला……!            

केज दि.१३- केज-अंबाजोगाई रोडवर माऊली साउंड सर्व्हिस या दुकानासमोर शनिवार (दि. १३) सायंकाळी ७:१५ च्या सुमारास एकाच मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
          येथील केज-अंबाजोगाई या महामार्गावर माऊली साउंड सर्व्हिस या दुकाना समोर अंदाजे ४५ वर्ष वयाच्या इसमाने प्रेत आढळून आले. पोलीसांना माहिती मिळताच पोलीस जमादार धनपाल लोखंडे, बाळासाहेब अहंकारे आणि पत्रकार गौतम बचुटे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या जवळ बँकेचे पासबुक आढळून आले. त्यावर विलास महादेव घुले (रा.लाडेवडगाव ता. केज) असे नाव आहे. लाडेवडगाव येथे या बाबत अधिक चौकशी केली असता सदर मयत हा बेवारस असून त्याला जवळचे कोणी नातेवाईक नसल्याचे समजते.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close