क्राइम
दारूसाठी मुलाने फोडले बापाचे डोके…….!

केज दि.13 – दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार देणाऱ्या बापाचे मुलाने डोक्यात दगड मारून डोके फोडल्याची घटना केज शहरातील वकीलवाडी येथे घडली. याप्रकरणी मुलाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
केज शहरातील वकीलवाडी भागातील प्रकाश बलभिम कसबे ( वय ६० ) व त्यांची पत्नी हे वृद्ध दाम्पत्य घरी असताना १३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.१० वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा रमेश प्रकाश कसबे ( वय २१ ) हा हातात दगड घेऊन आला. त्याने वडिलांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार देताच त्याने वृद्ध पित्याच्या डोक्यात पाठीमागून दगड मारून डोके फोडले. हातावर ही दगड मारल्याने ते जखमी झाले. प्रकाश कसबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचा मुलगा रमेश कसबे याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार महादेव गुजर हे पुढील तपास करत आहेत.