हवामान
केज तालुक्यात पावसाला सुरुवात…..!

केज दि.17 – बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर केज तालुक्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली असून तालुक्यातील कानडी माळी, आनंदगाव व इतर कांही परिसरात पाऊस पडला आहे.
मध्यंतरी ही हवामान खात्याने पावसाचे संकेत दिले होते. त्यानुसार राज्यातील कांही जिल्ह्यात पाऊस बरसला मात्र बीड जिल्ह्यात हजेरी लावली नव्हती. परंतु आज दुपारी जिल्ह्यात हजेरी लावली असून केज तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी मेघ गर्जनेसह मध्यम स्वरुपात बरसला. सध्या पावसाचे दिवस नसले तरी ज्वारी पिकाला याचा फायदा होणार असून पाणी साठा आणखी वाढण्याची शक्यता आहे.