ब्रेकिंग
एएसपी पंकज कुमावत यांची आणखी एक धडाकेबाज कारवाई…….!
एक कोटी रुपये पेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल ताब्यात
केज दि.१९ – सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अवैद्य धंद्या विरुद्ध कारवाईचा सपाटा लावला असून तेहतीस लाख रुपयांच्या गुटख्यावर कारवाई होते ना होते तोच त्यांनी नांदेड पर्यत जाऊन सुमारे एक कोटी रूपये पेक्षा जास्त रकमेचे बायोडिझेल ताब्यात घेतले आहे.
१८ नोव्हेंबर रोजी पंकज कुमावत यांना एका गुप्त खबऱ्या मार्फत अशी माहिती मिळाली की, मुंबई व पुणे येथून बायोडिझेल घेऊन जाणारे चार टँकर हे केज मार्गे नांदेडकडे जात आहेत. माहिती मिळताच पंकज कुमावत यांनी दि. १८ नोव्हेंबर गुरुवार रोजी रात्री ९:३० मस्साजोग येथे सापळा लावला. त्या वेळी त्यांना एक टँकर आढळून आले. पंकज कुमावत यांनी टँकरचा पाठलाग करून त्यांनी टँकरचा ड्रायव्हर याला ताब्यात घेतले. अधिक विचारपूस केली असता हे टँकर बायोडिझेल घेऊन नांदेड येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. त्या नंतर पंकज कुमावत यांनी आपले पथकासह थेट नांदेड व लोहा गाठले. तेथे जाऊन त्यांनी नांदेड येथून व येथून (एमएच४६/जे इ ११०६), (एमएच-०४/ जीएफ-९८७३), (एमएच-२६/एच-८४९६) हे चार टँकर्स, एक स्कॉर्पिओ (एमएच-२१/एएक्स-१३५६) , ह्युंदाई (एमएच-२६/टी-९९९९) वेरणा या गाड्या ताब्यात घेतल्या. तीन टँकर्स मध्ये प्रत्येकी २५ हजार लिटर असे मिळून सुमारे ७५ हजार लिटर्स डिझेल भरलेले आहे. एका ट्रक मध्ये एक लोखंडी टाकी व डिझेल काढण्यासाठीचे मोटर्स ठेवलेली आहे. सदर प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कारवाईत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय केजचे बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, विकास चोपणे, सचिन अहंकारे, महादेव सातपुते, राजू वंजारे, सुहास जाधव यांच्यासह परळी पोलीस स्टेशनचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने, विष्णू फड आणि किशोर घटमल या पोलीस कर्मचारी पथकात सहभागी झाले होते.
दरम्यान, एका ट्रकमध्ये लोखंडी टॅंक ठेवून त्याच्या मध्ये डिझेल उपसण्यासाठी लागणारी मोटार व इतर यंत्रणा होती. त्या ट्रकला ताडपत्री झाकून टाकल्यास त्यामुळे आतील टँकर दिसून येत नव्हते. मात्र पंकज कुमावत यांनी तपास काढला.