व्वा रे व्वा कॉपी बहाद्दर, त्याची शक्कल बघून सर्वच चक्रावले…….!

पुणे दि.20 – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रियेसाठी काल घेण्यात आलेल्या पिंपरी चिंचवड हिंजवडी भागात उमेदवाराने अत्यंत हायटेक पद्धतीने कॉपी केल्याचे उघडकीस आले. एका उमेदवाराने कानात अगदी खोल ज्वारीच्या दाण्याएवडे ब्लूटूथ बसवून मास्कमध्ये चिप लपवली होती. तपासणीत पोलिसांनी त्याला मास्क काढायला लावला. मास्कमध्ये चिप असल्याचे पाहून पोलिसही थक्क झाले.
करण त्र्यंबक सुंदरडे या विद्यार्थ्याच्या जागेवर डमी परीक्षा देणारा हा उमेदवार आकाश जारवाल असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. पोलिसांनी मास्क काढायाला सांगितल्यावर मास्कमध्ये चिप तर कानात ब्लूटूथ लावल्याचे दिसून आले. करण आकाश विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कानातने ब्लूटूथ मात्र निघाले नाही. करमाड येथील एका डॉक्टरकडे नेऊन त्याच्या कानातील ब्लूटूथ काढावे लागले, अशी माहिती पोलिसांनी दिली.