क्राइम
लग्न का मोडले म्हणत शिवीगाळ करून धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी……!
केज दि.२० – माझे लग्न का मोडले असे म्हणुन धक्काबुक्की करून शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका विरुद्ध पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारूर तालुक्यातील चिंचपूर येथे दि.१९ रोजी तीन ते एकच्या दरम्यान मनोजकुमार अशोक तांबारे रा. आंदोरा ता.कळंब हा बाबुराव परमेश्वर साखरे रा. चिंचपूर यांच्या घरी आला व तू माझे लग्न का मोडले म्हणून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेला.सदर प्रकरणी बाबुराव साखरे यांच्या फिर्यादीवरून युसुफ वडगाव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ श्री. नागरगोजे हे करत आहेत.