तालुक्यातील धनेगाव येथे एक महिला माहेरी होती. परंतु दि.१६ रोजी १० च्या सुमारास सचिन संजय पवार हा धनेगाव येथे आला व पांढऱ्या रंगाच्या गाडीत तिस बळजबरीने बसवून घेऊन गेला व हावरगाव (ता.कळंब) येथील त्याच्या मोकळ्या शेतात जबरदस्तीने ठेवले.
सदर महिलेच्या तक्रारीवरून सचिन पवार विरुद्ध युसुफ वडगाव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक श्री.पिंपळे हे करत आहेत.