#Social
रिपाईचे केज तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन…….!
केज दि.२४ – तालुक्यातील लव्हुरी येथील अतिक्रमित गायरान जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवावे आणि एस टी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे. यासह इतर मागण्यांसाठी रिपाई तालुकाध्यक्ष दीपक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली केज तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
तालुक्यातील लव्हुरी येथील गायरान जमिनीवर मागासवर्गीय भूमिहीन अतिक्रमण करून कसत आहेत. त्या अतिक्रमित गायरान जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. त्या संदर्भात लव्हुरी येथील काही अतिक्रमण धारकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमित जमिनीवर कोणताही प्रकल्प उभारू नये. असे आदेश दिलेले असतानाही; त्या आदेशाचे दखल न घेता सौरऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. त्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम तात्काळ बंद करण्यात यावे. या मागणीसाठी दि. २३ नोव्हेंबर रोजी तालुका जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांच्या आदेशा वरून अध्यक्ष दीपक कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन वाघमारे व सल्लागार उत्तम आप्पा मस्के, रविंद्र जोगदंड, राहुल सरवदे, भास्कर मस्के, रमेश निशिगंध यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे.
तसेच लव्हुरी येथील गायरान अतिक्रमणीत जमीनीवर सौरऊर्जा प्रकल्प रद्द करावा. अतिक्रमणधारक सुभाष पंढरी गायसमुद्रे व पंढरी विश्वनाथ गायसमुद्रे यांनी व अतिक्रमीत केलेल्या जमीनीवर सौर ऊर्जा प्रकल्पाचे साहीत्य टाकुन नुकसान केले; त्याची चौकशी करावी. एस टी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे. कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खाजगी क्षेत्रातील हमाल मापाडी व असंघटित कामगार यांना शासकीय योजना आणि आर्थिक अनुदान देण्यात यावे. क्रांतीनगर येथील रहिवाशांना जागेचे कबाले देण्यात यावेत. यासह सुमारे सतरा मागण्यासाठी केज तहसील कार्यालया रिपाईंच्या वतीने समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात तालुका अध्यक्ष दीपक कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन वाघमारे, जिल्हा सल्लागार उत्तम आप्पा मस्के, शहराध्यक्ष भास्कर मस्के, राहुल सरवदे, रवींद्र जोगदंड, गौतम बचुटे, रमेश निशिगंध, दिलीप बनसोडे, विकास आरकडे, विजय मस्के, जनार्धन सरवदे, विजय डोंगरे, संजय सरवदे, सुनील कांबळे, गजेंद्र धिरे, बाळासाहेब कांबळे, रघुनाथ ढालमारे, रोहित कांबळे, हबीब पठाण, पंढरी गायसमुद्रे, राजेंद्र जाधव, किसन जाधव, आश्रुबा जाधव, कल्याण घोडके, भक्ताजी बनसोडे, पप्पू भालेराव, मिठठू बनसोडे यांच्यासह आंदोलक सहभागी झाले होते.