महाराष्ट्रात ”या” महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका……!
मुंबई दि.24 – संपूर्ण राज्यभरात कोरोना महामारीने थैमान घातलं होतं. अशातच कोरोनाच्या दुसर्या लाटेनेही महाराष्ट्रभर हाहाकार माजवला होता. परंतु काही दिवसांपासून रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. अशातच आता महाराष्ट्रात तिसरी लाट येण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे.
कोरोना नियंत्रणात आल्यानंतर अनेकजण बेजबाबदारपणे वागू लागले आहेत. त्यामुळे आता कोरोनाचा धोका वाढल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर येत्या डिसेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता देखील राजेश टोपे यांनी वर्तविली आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये काळजी घ्यावी, असा सल्ला देखील त्यांनी राजेश टोपे यांनी दिला आहे. येत्या डिसेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोनाची ही लाट कमी तीव्रतेची असणार आहे, असंही टोपे म्हणाले आहेत. राज्यात 80 टक्क्यांपैक्षा जास्त लोकांचं लसीकरण झाल्यामुळे आता संक्रमितांचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे ऑक्सिजन आणि आयसीयुची कमतरता कमी प्रमाणात भासेल, असंही राजेश टोपे म्हणाले आहेत.
दरम्यान, मागील वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाची पहिला लाट आली होती. तर या वर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाची दुसरी लाटेने हाहाकार माजवला होता. अशातच आता तिसरी लाट कमी धोकादायक असल्याचं सांगण्यात आल्याने आता सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे.