क्राइम

केज बीड रोडवरील अन्न पदार्थ निर्मिती ठिकाणी पोलिसांची मोठी कारवाई…….!

केज दि.25 – तालुक्यातील उमरी पाटीजवळ केज बीड रोडवरील एका कंपनीवर छापा टाकून बनावट खवा तयार करण्याचा गोरख धंदा एएसपी पंकज कुमावत यांच्या टीमने उघड केला असून सदरील कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे.

अधिक माहितीइ अशी की, दि. 24/11 /20 21 रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना गुप्त बातमी मिळल्यावरून केज ते बीड जाणारे रोडवर विखे पाटील सहकारी साखर कारखान्या समोर उमरी शिवारात व्हर्टिकल फुड्स राधाकृष्ण कंपनी चे मालक धनंजय महादेव चोरे रा. जिवाचीवाडी हल्ली मुक्काम उमरी शिवार तालुका केज हे त्यांचे कंपनीमध्ये दुधाचे पावडर पासून बनावट खवा तयार करून त्याची बाहेर जिल्ह्यात विक्री करीत आहे अशी माहिती मिळाली होती.

                     त्यानुसार सदर ठिकाणी छापा मारण्यासाठी फूड अँड ड्रग्स चे सहाय्यक आयुक्त सय्यद हस्मी  व त्यांच्या सोबत अन्न सुरक्षा अधिकारी श्री तन्मडवार व त्यांचे पथक यांना बोलून त्यांची मदतीने दोन पंचासह सदर ठिकाणी जाऊन रात्री 9 वाजता छापा मारला.त्या ठिकाणी दुधाचे पावडर मध्ये वनस्पती रूची  तेल मिक्स करून त्यापासून तयार केलेले खव्याचे पदार्थ संशयित वाटल्याने अन्न सुरक्षा अधिकारी सय्यद इम्रान हस्मी  तन्मडवार यांनी सदर ठिकाणाहून 2958 किलोग्राम किमती 5 लाख 37 हजार 480 रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त केले. जप्त केलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचे नमुने सीए तपासणी कामे काढून घेऊन ताब्यात घेतले असून  कंपनी पुढील आदेशापर्यंत  सील केली आहे.

                 सदरची कारवाई सहा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत अन्नसुरक्षा पथकाचे अधिकारी सय्यद इम्रान हाश्मी ,तन्मडवार, मुकतार व पोलीस उपनिरीक्षक ) मारुती माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी दराडे बाबासाहेब बांगर, पोलीस नाईक रामहरी भंडाने, राजू वंजारे, सचिन आहंकारे,  संतोष राठोड, शेंडगे, मपोना पाचपिंडे यांनी केली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close