हवामान

पुढील दोन दिवसांचा हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे……!

4 / 100

औरंगाबाद दि.1 – गेल्या काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाल्याने मराठवाड्यासह (Rain alert) राज्यातील काही भागांना गारवा आणि ढगाळ वातावरण (Weather forecast) अशा दोन्ही स्थितीचा सामना करावा लागत आहे. औरंगाबाद शहरासह, ग्रामीण भागात तसेच मराठवाड्यातील काही भागात मंगळवारी वादळी वाऱ्यासह पाऊस (Heavy Rain) झाला. तसेच महाराष्ट्राच्या पश्चिम भागातही बदललेल्या हवामानाचा फटका बसत आहे. पुढील दोन दिवस ही स्थिती कायम राहिल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

औरंगाबादमधील प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात कोकण किनारपट्टी, मुंबई, ठाणे, विरार, पालघर, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक या भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळतील. तसेच औरंगाबादमधील कन्नड, वैजापूर, गंगापूर तालुक्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात पुढील तीन दिवस वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यात औरंगाबाद, बीड, उस्मनाबाद, जालना जिल्ह्यात या वादळी वाऱ्याचा फटका बसेल. पुढील तीन दिवस म्हणजेच 4 डिसेंबरपर्यंत मराठवाड्यात हवामानाची ही स्थिती राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान,बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण होऊन हे वारे पश्चिम बंगाल म्हणजेच कोलकत्याच्या दिशेने जातील. त्यामुळे 3 ते 4 तारखेनंतर वातावरणात अचानक बदल होऊन राज्यभरात अचानक थंडीत वाढ होईल, अशी माहितीही तज्ज्ञांनी दिली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close