#Social
हाडाचे पत्रकार गौतम बचुटे आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित…….!
केज दि.१ – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित शिक्षक दिनी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज यांच्या वतीने पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
केज तालुक्यात पत्रकारीता क्षेत्रात आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले पत्रकार गौतम बचुटे यांना स्व. विठ्ठलराव कृष्णाजी सोनवणे यांच्या स्मृती निमित्त जनार्धन सोनवणे यांच्या तर्फे सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देवुन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कृषि अधिकारी सुरेश खंदारे, प्रमुख पाहुणे म्हणून बालविकास अधिकारी आर.डी. कुलकर्णी, ॲड. राजेसाहेब देशमुख, आदर्श शिक्षक जी.बी.गदळे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय उर्फ पिंटू ठोंबरे, डॉ. हनुमंत सौदागर, हनुमंत भोसले, हनुमंत घाडगे, जनार्धन सोनवणे, किशोर भालेराव, विष्णू यादव, गोविंद गायकवाड, प्रा. डॉ. नवनाथ काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यान, सत्काराला उत्तर देताना पत्रकार गौतम बचुटे यांनी कोणतेही काम करताना त्यात स्वतःला झोकून देत काम केले; तर त्यात स्वतःला आत्मीक समाधान मिळते. संकट समयी मदत करताना ते संकट जर स्वतःवर आले असते; तर जसे वाटते की, कोणी तरी आपल्याला मदत करायला हवी. अगदी त्याच भावनेने आपण लोकांसाठी काम केले. तीच माझ्यासाठी खरी ऊर्जा असल्याचे सांगितले.