मुंबईच्या जेजे पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस हवालदाराने सामाजिक बांधिलकी जोपासत मुलाचे लग्न अगदी साध्या पद्धतीने लावत, लग्नासाठी जमवलेले पैसे कोरोना योद्ध्यांच्या मदतीसाठी वापरले आहेत. त्यांचे हे कार्य इतर अधिकार्यांसाठी तसेक लॉकडाऊनमध्ये साध्या पद्धतीने लग्न सोहळे उरकणार्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून पोलिस दलातून या पोलिसावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मुंबईच्या जेजे पोलिस ठाण्यात बागी हेे सध्या कार्यरत आहे. नुकतेेेच त्यांचाा मुलगाा पवन याचे लग्न ठरलेे होतेे. लग्नाची तारीख जशी जवळ आली त्याच वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर विवाह सोहळा अतिशय साध्या पद्धतीने आणि मोजक्याच कुटुंबीयांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय बागी यांनी घेतला. दोन्ही कटुंबातील मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत मुलाचा विवाहसोहळा संपन्न झाला. त्यामुळे दोन्ही कुटुंबियांचे पैसे वाचले. माञ याच वाचलेल्या पैशातून काही तरी लोकउपयोगी गोष्ट केल्यास मुलाच्या संसारला त्या लोकांचे आशीर्वाद मिळतील ही इच्छा बागी यांच्या मनात होती. कारण 24 तास पोलीस सेवेत कार्यरत असताना, कोरोनाशी लढताना त्यांनी प्रशासनाला पाहिले होतेे. त्यामुळेच त्यांनी नागरिकांमध्ये लग्नातूून साठलेल्या पैशातून सँनिटायझर वाटण्याची संकल्पना कुटुंबियांपुढे मांडली. सर्वांना ती आवडली ही, मग काय बागी यांनी बादारातून लग्नातून उरलेल्या पैशातून सँनिटायझर खरेदी करत नागरिकांमध्ये वाटत कोरोनाची जनजागृती केली.