आरोग्य व शिक्षण
केज शहरात एड्स दिनानिमित्त जाणीवजागृती व तपासणी शिबिर…..!
केज दि.३ – ग्रामीण विकास मंडळ लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प एफ.एस.डब्ल्यु. आयोजित जागतिक एड्स दिनानिमित्त जाणिव जागृती व तपासणी शिबिर वसंत महाविद्यालय केज येथे संपन्न झाले.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य एम.बी. नखाते, टी आय. प्रकल्पाचे पीपीपी डॉक्टर नंदिनी ठोंबरे, उपप्राचार्य श्री.चव्हाण, उपजिल्हा रुग्णालय आयसीटीसीच्या समुपदेशक शोभा साकसमुद्रे , समुपदेशक सिता गिरी, प्राध्यापक श्री.चाळक, ठोंबरे, एलडब्ल्युएस चे सलीम शेख, क्षेत्रीय कार्यकर्त्या राऊत सायरंदा, सिंधू आदमाने, मुळे सिंधु यांची उपस्थिती होती.
यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गुप्तरोग एच.आय. व्ही./ एड्स, कावीळ ,टीबी अशा आजारावर पण समुपदेशन करण्यात आले. एच.आय.व्ही./ एड्स ची कारणे,लक्षणे आणि उपचार यावर सखोल असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले.