तातडीने पावलं उचलून देशपातळीवर निर्णय घेणं आवश्यक…….!
मुंबई दि.6 – राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याने भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. ओमिक्रॉनचे वाढते संकट बघता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग बघता तातडीनं पाऊलं उचलण्याची गरज असल्याचं मत अजित पवारांनी व्यक्त केलं आहे.
ओमिक्रॉनबाबत केंद्र सरकाराच्या आरोग्य विभागाने कडक धोरण जाहीर करून ते अवलंबनं गरजेच असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. ज्या ज्या शहरांमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळं आहेत त्या ठिकाणी विशिष्ठ नियमावली असावी, असा सल्ला अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे.ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले होते त्यांनाच या व्हेरिएंटची (Omicron Varient) बाधा झाली आहे. मग त्यासाठी बुस्टर डोसची गरज आहे का? आपल्याकडे डोस उपलब्ध आहेत का? याबाबत देशपातळीवर निर्णय घेणं आवश्यक आहे, असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान, ओमिक्रॉनबाबत (Omicron) मुख्यमंत्र्यांसह प्रशासनाचं बारकाईने लक्ष असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं. वेगवेगळ्या राज्यातही इतर देशातून नागरिक येत आहेत, त्याबद्दल केंद्र सरकारनं कडक भूमिका घेणं गरजेचं असल्याचं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.