#Judgement

पत्नीस जिवंत जाळल्या प्रकरणी आरोपीस जन्मठेप……!

आर. एस. पाटील, अतिरिक्त सत्र न्यायाधीश-४ बीड यांचा महत्वपूर्ण निकाल

1 / 100
बीड,दि.८ – तालुक्यातील पोखरी येथील मनिषा शाहाजी फाळके हीच्या खून प्रकरणी मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ४ श्री. आर. एस. पाटील यानी आरोपी पती शाहाजी आश्रुबा फाळके व दिर बबन आबा फाळके, रा. पोखरी ता. जि बीड यांना क. ३०२ सह ३४ भादवि प्रमाणे दोषी ठरवुन जन्मठेपेची व दंडाची शिक्षा सुनावली आहे.
             थोडक्यात माहिती अशी की, मयत मनिषा शहाजी फाळके हिचा विवाह घटनेच्या नऊ वर्षापूर्वी शहाजी आश्रुबा फाळके रा. पोखरी ता. जि. बीड याचेशी झाला होता. तीला सासू-सासरे, एक दिर, नवरा व तीन मूली आहेत. सास-याच्या नावावर ५ एकर शेती आहे ती वाटून दया अशी मनिषाची मागणी होती. परंतू घरचे तयार नसल्याने ते नेहमी तिला भांडत होते व नवरा मारहाण करत होता तसेच सासू व दिर हे तू फक्त रानात ये मग तुला दाखवतो” असे म्हणून भांडत होते.
दिनांक १३.०५.२०१६ रोजी पहाटे ०४:०० वा मनिषा घरात झोपलेली असताना तिचा नवरा व दिर घरात आले तिच्या नव-याने घरातील कॅन्ड मधील रॉकेल तिच्या अंगावर ओतले व दिर बबन याने काडी पेटी ओढून तिच्या अंगाला टाकली. मोठमोठ्याने ओरडु लागल्याने घराजवळील देवळात झोपलेले पाच-सहा लोक पळत येउन मनिषाच्या अंगावर पाणी टाकून आग विझवली व लिबागणेश येथील रिक्षात टाकून तिला इतर लोकांनी सरकारी दवाखाना बीड येथे नेवून ऍडमीट केले. नंतर पोलीसांनी तिचा मृत्यूपूर्व जबाब घेतला त्यावरून आरोपी शाहाजी त्याची आई सोजरबाई व भाउ बबन याच्या विरुध्द क. ३०७,४९८अ ५०६ सह ३४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल केला.त्यातच दिनांक १९.०५.२०१६ रोजी मयत मनिषा उपचारा दरम्यान मयत झाली. त्यावरून कलम ३०२ वाढवण्यात आले. सदर गुन्हयाचे कागदपत्रे नेकनूर पोलीस स्टेशन यांचे कडे वर्ग करण्यात आली व त्यानुसार गुन्हा र. नं. ६८/२०१६ नोंदवण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोउपनि आर. बी. पाटील यांचेकडे देण्यात आला. त्यांनी सदर प्रकरणात तपास करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले.
                   सदर प्रकरणाची सुनावणी मा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-४ यांचे न्यायालयात झाली. सदर आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे एकुण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात मृत्यूपूर्व जबाब नोंदवणारे हेड कॉ., विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची साक्ष, वैद्यकीय पुरावा, घटनास्थळ पचं यांचे पुराव्याचे अवलोकन करून व सहायक सरकारी वकील ऍड. बी. एस. राख यांचा युक्तीवाद ग्राहय धरून मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-४ श्री. आर. एस. पाटील यांनी आरोपी शहाजी आबा फाळके व आरोपी बबन आश्रुबा फाळके, रा. पोखरी ता. जि बीड यांस क. ३०२ भादवी अन्वये जन्मठेपेच्या कारावासाची व प्रत्येकी पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणा मध्ये सरकारी पक्षा तर्फे अडॅ. बी. एस. राख यांनी काम पाहिले तसेच या प्रकरणी पैरवी अधिकारी म्हणून मोहन मिसाळ, हेकॉ यांनी कर्तव्य बजावले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close