केज शहरापासून जवळच बीड रस्त्यावर असलेल्या रमाई नगरमध्ये सामाजिक कार्यकर्ते गोपीनाथ वामनराव इनकर यांचे घर आहे. ७ डिसेंबर रोजी दुपारी २.३० ते ५ वाजेच्या दरम्यान घरी कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घराची झडती घेतली. घरातील पेटीत स्टीलच्या डब्यात ठेवलेले नगदी ३० हजार रुपये व सोन्याचे अशोकचक्र, कानातील फुले, नाकातील नथ, चांदीचे पायातील चैन हे दागिने असा ४१ हजार ३५१ रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. गोपीनाथ इनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे हे पुढील तपास करत आहेत.