राज्यसभेत खासदार रजनीताई पाटील यांनी ओबीसी आरक्षणावर आपली प्रखर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी केंद्राने वेळेत इंपेरिकल डाटा न दिल्यामुळे आज ओबीसींवर ही वेळ आल्याची सांगितले. तसेच मोठ्या प्रमाणावर असणारा ओबीसी समाज हा प्रवाहातून बाहेर पडत असेल तर पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही खेदाची बाब आहे. महाराष्ट्र सरकारने एक अधिनियम काढून निवडणुका जाहीर केल्या होत्या.परंतु सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला असून ओबीसी समाज अडचणीत सापडला आहे.
दरम्यान ओबीसी समाजाला घेऊन निवडणुका होत नसतील तर त्यांना न्याय मिळू शकत नाही.त्यामुळे केंद्राने इंपेरिकल डाटा राज्यसरकारला देऊन ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तात्काळ पावले उचलण्याची गरज असल्याचेही मत खा.पाटील यांनी व्यक्त केले.