#Accident
विजेचा शॉक लागून ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू……!

केज दि.१२ – तालुक्यातील मस्साजोग येथील हनुमंत ज्ञानोबा देशमुख (३६) यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.
१२ डिसेंबर रोजी दुपारी १ वा. च्या. दरम्यान हनुमंत ज्ञानोबा देशमुख वय ३६ वर्ष रा. मस्साजोग हे सांगवी (सारणी) शिवारात काम करत असताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे प्रक्रिया संहिता १७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करीत असून धनपाल लोखंडे करीत आहेत.