#Election
केज न.पं. निवडणूक २०२१ : ६० उमेदवार रिंगणात २५ जणांची माघार……!
केज दि.१३ – नगरपंचयात ची निवडणूक प्रक्रिया सुरू असून प्रक्रियेतील महत्वाचा आणि टप्पा आज पार पडला.निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून छावणीमध्ये उरलेल्या 85 अर्जातून आज अर्ज परत घेण्याच्या दिवशी एकूण २५ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून ६० उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.
ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने १७ पैकी १३ जागांसाठी केज नगरपंचयात ची निवडणूक होत आहे. अर्ज छावणीमध्ये एकूण ८५ अर्ज वैध ठरले होते. परंतु अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निलेश केशवराव साखरे, धनश्री धनंजय कुलकर्णी, संगीता संजीवन कोरडे, दत्तात्रय बालासाहेब हंडीबाग, उमा गुलाबराव शिंदे, कलीमोद्दीन अलीमोद्दीन इनामदार, जलालोद्दीन मुन्नूमिया इनामदार, नईमोद्दीन वलीमोद्दीन इनामदार, निखत अब्दुल लखुदुस इनामदार, मुजीब नय्युमोद्दीन इनामदार, हारून चांदपाशा इनामदार, शबाना अफसर इनामदार, समिना मुजीब इनामदार, इशरत बेगम अजिमोद्दीन इनामदार, मनीषा योगीराज काळे, रेश्मा सतीश डांगे, सगजनाबाई गुलाब दांगट, स्वप्नील संपतराव इंगळे, युनूस सादेक खुरेशी, प्रकाश अंबादास गुंड, सागर गणेश डिकुळे, हुसेन बिबनसाहब शेख, यशोदा बंडू मस्के, छाया व्यंकटराव हजारे, रेश्मा जकीयोद्दीन इनामदार यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणुकीच्या रिंगणात आता ६० उमेदवार आपले भाग्य अजमावणार आहेत.
दरम्यान ओबीसी आरक्षण संदर्भात होणारी आजची सुनावणी एका दिवसाने लांबणीवर पडल्याने ओबीसी उमेदवारांचे काय होणार ? हे उद्या स्पष्ट झाल्यानंतर आणखी कांही फेरबदल होतो की काय याची उत्सुकता लागली आहे.