राजकीय
महाविकास आघाडी तून शिवसेने च्या वतीने कोणाची लागणार वर्णी????
कल्याणी वाघमोडे यांचे नाव चर्चेत
डी डी बनसोडे
June 8, 2020
पुणे – 6 जून रोजी विधान परिषदेच्या बारा जागा रिक्त झालेल्या आहेत. या बारा जागांपैकी महा विकास आघाडीला प्रत्येकी चार जागा मिळतील .मागील कालावधीत या बारा जागांपैकी दोन जागांवर धनगर समाजाचे आमदार कार्यरत होते .लोकसंख्येच्या मानाने महाराष्ट्रात मोठ्या संख्येने धनगर समाज आहे .या दोन जागा पुन्हा धनगर समाजाला मिळायला हव्यात ,यापैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडे प्रत्येकी एक जागा होती.
मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत आणि शिवसेनेने धनगर समाजाला न्याय द्यायला हवा . शिवसेनेनेही एक जागा धनगर समाजाला द्यायलाच हवी, अशी मागणी समाजाकडून होत आहे.
2014 च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपला धनगर आरक्षण मुद्द्यावरून भरपूर पाठिंबा मिळाला परंतु भाजपला केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असतानाही आरक्षणाचा शब्द पूर्ण करता आला नाही . भाजपच्या कार्यकाळात राम शिंदे व महादेव जानकर यांच्या रूपाने धनगर समाजाला दोन कॅबिनेट मंत्रिपद मिळाली .डॉ. विकास महात्मे यांच्या रूपाने धनगर समाजाला राज्यसभेची प्रथमच खासदारकी मिळाली. भाजपाने नुकतेच गोपीचंद पडळकर यांनाही उमेदवारी दिली.
आता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षातून किती व्यक्तींना विधानपरिषद सदस्य पदी निवड करणार याची उत्सुकता आहे.
शिवसेने मध्ये नारायण पाटील, प्रकाश शेंडगे, कल्याणी वाघमोडे यांच्या नावाची समाजाकडून चर्चा आहे. यामध्ये महिला म्हणून कल्याणी वाघमोडे यांचे कार्य महाराष्ट्र भर आहे. उच्च विद्याविभूषित ,प्रभावशाली व्यक्तिमत्त्व ,उत्कृष्ट वक्त्या म्हणून त्या परिचित आहेत .गेली दहा वर्ष समाजाच्या न्याय हक्कासाठी उत्कृष्ट पणे कार्य करत आहेत. शिवसेनेमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये महिला स्टार प्रचारक म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे. धनगर आरक्षण मुद्द्यावर महाराष्ट्रात एकमेव महिला आंदोलन कर्त्या म्हणून सर्व नेत्यांना परिचित आहेत. समाजामधून तळागाळात कार्य असणाऱ्या जनतेसाठी नेहमी झटणाऱ्या कल्याणी ताई यांच्या नावावर शिवसेनेने शिक्कामोर्तब करावे ,असा सूर उमटत आहे.
नुकताच नऊ जागांसाठी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाने एक संधी दिली परंतु महा विकास आघाडीच्या वाट्याला पाच जागा असूनही एकही संधी धनगर समाजाला देण्यात आली नाही. त्यामुळे आता प्रत्येकी एक जागा महाविकासआघाडी ने समाजाला द्यावी असा एकंदरीत सूर समाजातून उमटत आहे.