#Resarvation
ओबीसी आरक्षण : उर्वरित सुनावणी उद्या……!

बीड दि.14 – ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठा पेच निर्माण झाला होता.मात्र राज्य सरकारने यावर फेरविचार याचिका दाखल केल्यानंतर त्याची सुनावणी दि.13 डिसेंबर रोजी ठेवण्यात आली होती, 14 रोजी दुपारी 2 वाजता होणार अशी माहिती होती.परंतु आज सुनावणी पूर्ण होऊ न शकल्याने आता उर्वरित सुनावणी उद्या ११ वाजता सुनावणी होणार आहे.
दरम्यान ओबीसींना घेऊन निवडणुका होणार, त्यांच्याशिवाय होणार की निवडणूक तात्पुरत्या स्थगित होणार हे आता उद्या स्पष्ट होणार आहे. तर दुसरीकडे निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेद्वारांसह नेत्यांचा जीव टांगणीला लागला असला तरी उद्यापर्यंत थांबावे लागणार आहे. तर राज्यसरकारने इंपेरिकल डाटा उपलब्ध करून देण्याचा युक्तिवाद केल्याचा समजते.