क्राइम
30 वर्षीय युवकाचा विनयभंग, दोन तरुणींसह अन्य एकावर गुन्हा दाखल……!

केज दि.१४ – एका वसाहतीत राहणाऱ्या ३० वर्षीय तरुणाचा दोन तरुणीसह एका तरुणाने त्याच्या घरी जाऊन विनयभंग केल्याचा प्रकार अंबाजोगाई शहरात घडला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
एका तीस वर्षीय तरुणाचा एका मुलाच्या मदतीने दोन तरुणींनी वाईट हेतूने हात धरून विनयभंग केला. तसेच शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडीत तरुणाच्या फिर्यादीवरून दोन तरुणींसाह एका तरुणावर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुरनं ४८१ / २०२१ कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ भादवी नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक बनसोडे करीत आहेत.