केज येथील खरेदी – विक्री संघाच्या धारूर रस्त्यालगत असलेल्या कार्यालय इमारत आहे. अज्ञात व्यक्तीने इमारतीच्या परिसरातील तार कंपाऊंड २० फूट व पूर्वेकडे दगडी बांधकामाचे २० फूट कंपाऊंड जेसीबीने तोडले. तोडलेल्या कंपाऊंडपासून व संघाच्या कार्यालयामधून पूर्व व पश्चिम असा मुरूम मिश्रित माती टाकून रस्ता केला आहे. १५ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता संघाचे व्यवस्थापक बिभीषण सोपानराव ठोंबरे हे कामकाजासाठी संघाच्या कार्यालयात गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
व्यवस्थापक बिभीषण ठोंबरे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक मंगेश भोले हे पुढील तपास करत आहेत.