क्राइम
नेकनूरहद्दीत नवदाम्पत्याची आत्महत्या.…..!
नेकनूर दि.16 – येथून जवळच असलेल्या वैतागवाडीमध्ये नवदाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (दि.१६) समोर आली आहे.मयत महिला ही सात महिन्याची गर्भवती असल्याची माहिती आहे.नेकनूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वैतागवाडी येथे राजेश जगदाळे (वय-२५) व त्यांची पत्नी दिपाली राजेश जगदाळे (वय-२०) या दाम्पत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून राजेश आणि दीपालीचा ११ महिन्यापूर्वी विवाह झाला होता.दीपाली ही सात महिन्याची गर्भवती असल्याची माहिती असून आत्महत्यामागचे कारण रात्री उशिरापर्यंत समोर आले नव्हते.