#Social
बनसारोळा येथे ग्रामपंचायत विरोधात ग्रामस्थांचे उपोषण..…….!
भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी.....!
केज दि.१७ – तालुक्यातील महत्वाची व मोठी असलेल्या बनसारोळा ग्रामपंचायत च्या माध्यमातून २०१८ ते २०२१ मध्ये झालेल्या विविध कामांची चौकशी करावी यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत समोरच उपोषण सुरू केले असून याबाबत वरिष्ठांना निवेदन देऊनही कारवाई न केल्याने हे उपोषण सुरू केले असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
जिल्हाधिकारी यांना या प्रश्नी निवेदन दिले असून यामध्ये गावातील पाणीपुरवठा, लाईट, कचरा गाडी, घरकुल, विहिरी अशा विविध कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आंदोलन कर्ते नवनाथ काकडे यांनी केला असून यासह गावातील सांडपाण्याचा प्रश्न, सरपंच यांच्या नातेवाईकांच्या हस्तक्षेपामुळे कामाची पारदर्शकता नष्ट झाली आहे.
तसेच मागील २०१८ ते २०२१ या कालावधी झालेल्या कामाची चौकशी झाल्याशिवाय १५ व्या वित्त आयोगाचा निधी टाकू नये अशी मागणी देखील या निवेदनात केली आहे. तर यावर ठोस चौकशी समिती नेमण्यात यावी व चौकशी करावी अशी मागणी उपोषणाला बसलेल्या गावकऱ्यांनी केली आहे.