#Corona

एकाच शाळेतील 18 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण…….!

5 / 100

मुंबई दि.१८ – राज्य सरकारने डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता राज्यातील शाळा तब्बल दोन वर्षांनी सुरू झाल्या आहेत. मात्र, अजूनही कोरोना आणि आॅमिक्रोनचे संकट आहेच. तसेच सरकारने शाळा सुरू करण्याच्या अगोदर नियमावली देखील जारी केली होती. मात्र, असे असताना देखील नवी मुंबई येथून धक्कादायक माहीती पुढे येते आहे.

घणसोलीतील शेतकरी विद्यालयातील तब्बल 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मागील 3 दिवसात 800 विद्यार्थ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. कतारवरून आलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र, त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह निघाला. हा मुलगा घरात न थांबता शाळेत गेल्याने इतर विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह झाले असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांना वाशी येथील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. सर्वांची तब्बेत उत्तम असल्याचे देखील सांगितले जात आहे. आज पुन्हा नवी मुंबई महापालिकेच्या 3 टीम कोरोना चाचणी करण्यासाठी शाळेत दाखल झाल्या होत्या. मात्र घाबरून विद्यार्थी शाळेत आले नाहीत. जे विद्यार्थी शाळेत आले नाहीत. त्याची घरोघरी जाऊन कोरोना चाचणी केली जाणार असल्याची माहीती आहे. शाळासंदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली होती. मात्र, तरीही एकाच शाळेतील तब्बल 18 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे पालकांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close