#Election
खा. रजनीताई पाटलांच्या प्रचाराने केज शहरात काँग्रेसची हवा…….!
केजचे पाटील विरोधकांना दाखवणार "हात"
केज दि.१९ – केज नगरपंचायत निवडणुकीत चार पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहेत व आता या निवडणुकीत चांगलाच रंग भरला असला तरी केजची जनता पाटलांशिवाय कोणावरही विश्वास ठेवणार नाही असे चित्र सध्या दिसून येत असून गत निवडणुकीप्रमाणेच याही निवडणुकीत केजचे पाटील आपल्या विरोधकांना चांगलाच “हात” दाखवतील असा अंदाज आता व्यक्त होत आहे.
केज नगरपंचायत ची मुदत संपून दोन वर्षे गेले मात्र कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलत ढकलत डिसेंबर २०२१ उजाडले व नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आणि राजकीय गणित कोणाची बिघडली तर कोणाची जुळू लागली मात्र काँग्रेसने सुरुवातीलाच ही निवडणूक स्वबळावर लढवणार व कामाच्या जोरावर जनतेत जाणार हा अजेंडा घेऊन तयारी केली आणि त्या दृष्टीने त्यांनी स्वतंत्र पॅनल उभा केला. शहरात अतिशय तगडी असलेली टीम सध्या काँग्रेसकडे असल्याने वॉर्डा वॉर्डात काँग्रेसने नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा दिल्याने केज मध्ये कॉंग्रेसचाच बोलबाला असल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, आघाडी व शिवसेना अशी चौरंगी लढत असली तरी कॉंग्रेसला आघाडीचे कडवट आव्हान असून राष्ट्रवादी व शिवसेना मात्र सध्या तरी या स्पर्धेतही दिसून येत नाही त्यामुळे काँग्रेस व आघाडी यांच्यातच ही लढत होत असल्याचे दिसून येत आहे.
केज मध्ये महत्वाचा विषय म्हणजे व्यापारी संकुल यासाठी तत्कालीन कृषी आयुक्त व केजचे सुपुत्र उमाकांत दांगट यांनी केजची जिरायत खात्याची जागा नगरपंचायत ला व्यापारी संकुल उभारणीसाठी दिली मात्र आज ज्यांनी आघाडी करून काँग्रेसला शह देण्याचे ठरवले आहे त्यांनीच काही नागरिकांना या विरोधात कोर्टात पाठवले व आज केजचा कळवळा दाखवत आहेत अशी चर्चा आता शहरात होताना दिसत आहे.