#Accident
केज शहरात पाच दुकानांना आग, सर्व साहित्य जळून खाक……!

केज दि.२२ – शहरातील मंगळवार पेठ कॉर्नर वरील पाच दुकानांना मध्यरात्री च्या सुमारास आग लागल्याने चारही दुकानांमधील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.
यामध्ये गवळी यांचे सोनाली ऑफसेट, जोगदंड यांचे भारत इलेक्ट्रिकल, उत्तम स्वीट होम व कृष्णा मोटारसायकल गॅरेज आणि अन्य एका दुकानाचा समावेश आहे. रात्री दीड वाजेच्या दरम्यान सदरील दुकानांना आग लागल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर दुकान मालकांना कळवण्यात आले. यामध्ये सर्व साहित्य जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले असून सदरील घटनेचा पंचनामा करण्यात येत आहे. सदरील आग नेमकी कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
