Omicron
…..तर राज्यातील शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे सूचक वक्तव्य……!
मुंबई दि.22 – 1 डिसेंबर पासून राज्यातील शाळांची घंटा पुन्हा वाजली. कित्येक महिन्यांनंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत होत. मात्र, कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचा फैलाव बघता शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे.
देशात सर्वात जास्त ओमिक्रॉनबाधीत रूग्ण महाराष्ट्रात (Maharashtra) आढळून आले आहेत. ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला तर राज्यातील शाळा पुन्हा बंद होण्याचे संकेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिले आहेत.
‘ओमिक्रॉनची रूग्णसंख्या वाढत गेली तर शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो’, असं सूचक वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी एएनआयशी बोलताना केलं आहे. त्यामुळे ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव वाढला तर शाळा बंद होण्याचे थेट संकेत वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
दरम्यान, देशातील ओमिक्रॉनबाधीत रूग्णांची संख्या 215 वर जाऊन पोहोचली आहे. देशात सर्वाधित ओमिक्रॉनबाधीत रूग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे ही संख्या वाढली तर शाळा पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे.