करुणा शर्मा – मुंडे यांची मोठी घोषणा……!

बीड दि.२३ – करुणा मुंडे यांनी नुकतीच मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेनं सगळीकडे चांगलीच खळबळ उडालेली पहायला मिळत आहे. करुणा मुंडे यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनं राजकीय वर्तुळातही खलबतं सुरु झाली आहेत.
गुरुवारी करुणा मुंडे यांनी ‘शिवशक्ती सेना’ (Shivshakti Sena) या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील भ्रष्टाचार रोखण्याचं काम करणार आहे, असं मुंडेंनी म्हटलं.राज्यात हजारो कोटींचे घोटाळे होत आहेत. पक्षात येण्यापासून निवडणूक लढेपर्यंत मंत्री होईपर्यंत कोट्यावधी रुपये दिल्याशिवाय पदे मिळत नाही. यासाठीच अशा भ्रष्टाचारासाठीच माझा पक्ष काम करणार आहे, असं करुणा धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, निवडणूक लढवण्याची वेळ जर आलीच तर मी परळीमधून निवडणूक लढवेल असंही करुणा मुंडे यांनी म्हटलं. त्यामुळे सध्या सगळीकडे त्यांच्याच नव्या पक्षाची चर्चा होताना दिसत आहे.