आपला जिल्हा
तलावात २४ वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळला……!

केज दि. – 25 तालुक्यातील एका २४ वर्षीय विवाहितेचा तलावात मृतदेह आढळून आला असून केज पोलीसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कोरेगाव येथील राजनंदिनी अविनाश घुले वय २४ वर्ष ही महिला घरी होती तर तिच्या घरचे बाहेरगावी गेलेले होते.परंतु सायंकाळी ती घरी नसल्याचे तिच्या मावस दिराने फोन करून तिच्या पतीला सांगितले. त्या नंतर तिचा पती कोरेगाव येथे परत आला असता त्यांनी गावात आणि शेतात तिचा शोध घेतला परंतु ती सापडली नाही.मात्र शोध घेत असताना सदर महिलेची एक चप्पल जाधव जवळा येथील तलावाच्या शेजारी मिळून आली. त्या नंतर दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी तळ्यात तिचे प्रेत आढळून आले.सदर माहिती पोलिसांना कळवून पोलीस आल्या नंतर गावकऱ्यांच्या मदतीने तिचे प्रेत पाण्यातुन बाहेर काढले. प्रेताची उत्तरीय तपासणी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केज पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे.
दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहे. दरम्यान विवाहितेचा मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही.