महाराष्ट्र

राज्यात तेरा जिल्हे रेडझोन मध्ये, पहा कोणत्या जिल्ह्यात किती आहेत सक्रिय कोरोना रुग्ण…….!

5 / 100

बीड दि.30 – राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढताना दिसत आहे. मागच्या कित्येक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.मात्र सर्वाकांही पूर्वपदावर येत असतानाच राज्यातील Covid-19 ची दुसरी लाट ओसरल्यानंतर सप्टेंबरनंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच 29 डिसेंबर रोजी सर्वाधिक तीन हजार 900 रुग्णांची नोंद झाली. चिंतेची बाब म्हणजे, 29 डिसेंबरला राज्यात ओमिक्रॉनचे (Omicron) सर्वाधिक 85 रुग्ण आढळले आहेत. राज्यातील मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad), पुणे (Pune), सातारा (Satara), सांगली (Sangli), कोल्हापूर (Kolhapur), सोलापूर (Solapur), नाशिक (Nashik), नगर (Nagar), औरंगाबाद (Aurangabad), नागपूर (Nagpur) या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. या पार्श्‍वभूमीवर परिस्थिती पाहून निर्बंध कडक होतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

                    राज्यात ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटचा विळखा घट्ट होत असून कोरोना बाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध लागू केले आहेत. तरीही, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही. दुसरीकडे, रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत जमावबंदी असतानाही रस्त्यावर सर्रास गर्दी पाहायला मिळत आहे. राज्यातील नऊ कोटी 14 लाख व्यक्‍तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लस (Covid Vaccine) टोचून घेणे अपेक्षित आहे. तरीही, अद्याप एक कोटी व्यक्‍तींनी लसीचा एकही डोस घेतला नसून दुसरा डोस घेण्याचा कालावधी संपूनही जवळपास 82 लाख व्यक्‍तींनी दुसरा डोस घेतलेला नाही. ‘हर घर दस्तक’च्या माध्यमातून गावोगावी लसीकरण मोहीम आयोजित करूनही आणि दोन्ही डोस न घेतलेल्यांवरील निर्बंध कडक करूनही लसीकरण 100 टक्‍के झालेले नाही. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकार सुरवातीला सर्वाधिक रुग्ण आढळणाऱ्या जिल्ह्यांमधील निर्बंध कडक करण्याच्या तयारीत असल्याचेही बोलले जात आहे

दरम्यान, मुंबई (8060), ठाणे (1638), पालघर (298), रायगड (317), पुणे (2053), सातारा (180), सांगली (90), कोल्हापूर (60), सोलापूर (89), नाशिक (412), नगर (385), औरंगाबाद (54), नागपूर (137), रत्नागिरी (44), सिंधुदुर्ग (12), जळगाव (9), नंदुरबार (4), धुळे (2), जालना (16), बीड (39), लातूर (33), परभणी (19), हिंगोली (1), नांदेड (20), अमरावती (8), अकोला (24), वाशिम (1), बुलढाणा (10), यवतमाळ (7), वर्धा (5), भंडारा (1), गोंदिया (8), चंद्रपूर (6) आणि गडचिरोली (7) असे सक्रिय रुग्ण आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close