क्राइम
अल्पवयीन मुलीचे अपहरण, केज तालुक्यातील घटना……!

केज दि.३० – इयत्ता १० वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली १६ वर्षाची मुलगी ही २९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली. तिचे अज्ञात कारणावरून अपहरण करण्यात आल्याची तक्रार तिच्या वडिलांनी युसुफवडगाव पोलिसात दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील १६ वर्षाची मुलगी ही इयत्ता १० वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. २९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घरातून अचानक बेपत्ता झाली. तिचा गावात आणि नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र तिचा कुठे ही तपास न लागल्याने अज्ञात व्यक्तीने तिचे अज्ञात कारणासाठी अपहरण केले असल्याची तक्रार त्या मुलीच्या वडिलांनी पोलिसात दिली. या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक परमेश्वर शिंदे हे पुढील तपास करत आहेत.