वाढत्या कोरोनाच्या धसक्याने नवीन निर्बंध लागू……!
मुंबई दि.३१ – लोक नवीन वर्षाच्या (New Year) तयारीला लागले आहेत. येत्या 31 डिसेंबरला (31st december) लोक नवीन वर्षाचं स्वागत करतील आणि या वर्षाला अलविदा करतील. मात्र या काळात गर्दी मोठ्या प्रमाणावर होत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवीन निर्बंध जारी केले आहेत.
देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या जशी वाढतेय, तशी मृतांची संख्याही मन हेलवणारी आहे. अशातच कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्राॅनचाही (Omicron) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यामुळे निर्बंध घालणं सक्तीचं झालं होतं. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. विवाह सोहळय़ांबरोबरच कोणत्याही समारंभात फक्त 50 जणांनाच परवानगी असेल, अंत्यविधीसाठी 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी, पर्यटनस्थळे, समुद्रकिनाऱ्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता या सर्व चौपाटय़ा बंद केल्या जाणार आहेत. याशिवाय कोरोनाबाबत आधीचे निर्बंधही कायम राहतील.
दरम्यान, कोरोनाचं सावट असताना ओमिक्राॅनच्या व्हेरिएंटनं (Omicron varriant) चिंता वाढवली आहे. ओमिक्राॅनचा संसर्ग वाढत असतानाच रुग्णांच्या संख्येतही झपाट्यानं वाढ होत आहे. संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरु नये म्हणून आतापासूनच खबरदारी घेतली जाताना दिसत आहे.