शेती

आज जमा होणार कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर सन्मान निधी…….!

8 / 100

मुंबई दि.१ –  गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची प्रतिक्षा देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना होती तो दिवस अखेर आज उजाडला आहे. नववर्षाचे मुहूर्त साधत शनिवारी (PM Kisan Samman Yojana) पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. गतवर्षी 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता जमा झाला होता. आतापर्यंत केवळ तर्क-वितर्क मांडले जात होते पण आज हा 10 हप्ताही खात्यावर जमा होणार आहे तर ही प्रक्रिया सुरु असतानाच दुसरीकडे (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. यापूर्वी त्यांनी सेंद्रिय शेतीचा मंत्र दिला होता आज शेतकऱ्यांना नववर्षाचा काय संदेश देणार हे पहावे लागणार आहे.

केंद्र सरकारच्या वतीने ही योजना राबवली जात असून देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होत आहे. मध्यंतरी यामध्ये अनियमितता आढळून आल्याने कर भरुनही लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून ही रक्कम परत घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 1 कोटी 5 लाख शेतकऱ्यांना या निधीचा लाभ होणार आहे. त्याअनुशंगाने 2 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी सांगितलेले आहे. तर दुसरीकडे या हप्त्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी न करता कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. यासाठी बॅंकामध्ये गर्दी करु नये असेही आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

दरम्यान, सन्मान निधी खात्यावर जमा होण्यास दोन दिवसांचा कालावधी असताना अनेकांना प्रश्न आहे की, eKYC ही प्रक्रिया केल्यावरच हा निधी जमा होणार का? न केल्यावर काय होणार. पण घाबरुन जाण्याचे कारण नाही. eKYC न केल्यासही हप्ता मिळणार आहे. मात्र, मार्च 2022 नंतरचे हप्ते मिळवायचे असतील तर मार्च 2022 पर्यंत ekyc करणे गरजेचे आहे. याकरिता केवळ 15 रुपये आकारले जाणार आहेत. त्यामुळे 10 वा हप्ता मिळण्यासाठी नाही पण भविष्यात ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close