#Social
शासकीय गुत्तेदार किरण देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नछत्र……!

केज दि.१ – बीड जिल्ह्यातील नामांकित शासकीय गुत्तेदार तथा प्रवीण कन्स्ट्रक्शन केज चे संचालक किरण गोकुळराव देशमुख (बापू) यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नछत्र चे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी किरण देशमुख यांचा वाढदिवस 1 जानेवारी रोजी सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. हारतुऱ्यावर खर्च न करता परभणी येथील जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी व नातेवाईकांसाठी अन्नछत्र सुरू करण्यात आले होते. यावेळी अन्य गरजू लोकांनीही अन्नछत्राचा लाभ घेतला.

सामाजिक कार्यकर्ते उद्धव देशमुख, लक्ष्मीकांत देशमुख इत्यादी मित्रपरिवाराने परिश्रम घेत गरजूंना लाभ मिळवून दिला.