आपला जिल्हा
झुंजार पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय हांडीबाग तर सचिवपदी रमेश गुळभिले……!
उपाध्यक्षपदी रमेश इतापे तर सहसचिव पदावर मनोरमा पवार यांची वर्णी

केज दि.2 – झुंजार पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष दशरथ चवरे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह केज येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.
यामध्ये झुंजार पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दत्तात्रय हांडीबाग तर रमेश गुळभिले यांची सचिवपदी निवड करण्यात आली.तर मनोराम पवार यांची सहसचिवपदी तसेच उपाध्यक्षपदी रमेश इतापे यांची निवड करण्यात आली. यावेळी दशरथ चवरे, नंदकुमार मोरे, महादेव दळवी, श्रीराम तांदळे, दादासाहेब ढाकणे, वाजेद शेख, दिनकर राऊत, सतिश केजकर, दादासाहेब, जावेद शेख, गोविंद शिनगारे, अशोक भोसले, विनायक ठोंबरे, सुमित मोरे, आप्पाराव सारुक यांची उपस्थिती होती.