#Corona

बीड जिल्ह्यात आणखी एका ठिकाणी कोरोना टेस्ट लॅबची उभारणी, 4 जानेवारी रोजी होणार उद्घाटन……!

2 / 100
बीड दि.३ – RTPCR (आरटीपीसीआर) TESTING LAB VRDL लॅबचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे हस्ते दिनांक ०४ जानेवारी २०२२ रोजी जिल्हा रुग्णालय, बीड येथे उदघाटन करण्यात येत आहे.
                   जिल्हात यापूर्वी स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण वैद्यकिय महाविद्यालयात ही सुविधा उपलब्ध होती. ना. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून बीड जिल्हयासाठी जिल्हा रुग्णालय, बीड येथे सुसज्य अशी RTPCR TESTING ची अदयावत लॅब उभारण्यात आली आहे. या लॅबव्दारे दररोज ५००० एतके टेस्टींग होऊ शकते. भविष्यात कोविडच्या तिस-या लाटेच्या अनुषंगाने वाढत्या रुग्णसंख्येच्या दृष्टीने रुग्णांचे निदान त्वरीत होण्यासाठी या लॅबचा उपयोग होणार असून अशा प्रकारची सुविधा जिल्हा रुग्णालयात सुरु होणार असल्याने रुग्णसेवेसाठी तत्पर असलेल्या जिल्हा रुग्णालयात आणखी एक सुविधा उपलब्ध केल्याबददल तसेच बीडच्या जनतेची सोय केल्याबददल ना. धनंजय मुंडे यांचे अभिनंदन होत आहे. या कार्यक्रमाला मा. ना. राजेशजी टोपे, आरोग्य मंत्री
                   बीडच्या जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या सिरसट, खासदार रजनीताई पाटील, खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार  प्रकाशदादा सोळंके, आमदार  बाळासाहेब आजबे,  आमदार मा. लक्ष्मण पवार, आमदार नमिताताई मुदंडा, आमदार संजय दौंड, आमदार विनायक मेटे, आमदार सतिषजी चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार सुरेश धस, नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार सुनिल धांडे, माजी मंत्री सुरेश नवले, माजी आमदार उषाताई दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमूख, शिवसेनेचे कुंडलीक खांडे व आप्पासाहेब जाधव, सभापती अशोक डक यांच्यासह जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलिस अधिक्षक  ए. राजा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ यांची उपस्थिती राहणार आहे.
                    दरम्यान कोविडच्या सर्व नियम व अटींचे पालन करून या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी केले आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close