सदरील हल्ला हा त्यांच्या मधुकर वाघ या सख्या भावानेच केला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तहसीलदार आशा वाघ ह्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून हल्लेखोरास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर आशा वाघ यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले आहे. सदर हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट नाही.