पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू……!

बीड दि.5 – पाणी पिण्यासाठी गेलेल्या तीन मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. उत्तर सोलापूर येथील मार्डी येथे शेततळ्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. गावातील जगताप यांच्या शेतातील शेततळ्यात बुधवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. कुटुंबासह गावावक शोककळा पसरली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सानिका सोनार (वय १७), पुजा सोनार (वय १३), आकांक्षा युवराज वडजे (वय ११) असे बुडून मरण पावलेल्या मुलींची नावे आहेत. चुलीसाठी लागणारे जळण गोळा करण्यासाठी तिन्ही मुली शेतात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना तहान लागली. पाणी पिण्यासाठी शेततळ्यात उतरल्या तेव्हा ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली. तिन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात नेले आहे. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, पोलीस निरीक्षक अरुण फुगे घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटेनाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.