क्राइम
एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाचा धडाका सुरूच…….!
केज दि.८ – एएसपी पंकज कुमावत रुजू झाल्यापासून दररोज कुठे ना कुठे कारवाया सुरूच आहेत. कित्येक अवैध धंदे करणारे गजाआड झाले असून लाखो नव्हे तर कोटींमध्ये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशीच एक कारवाई अंबाजोगाई तालुक्यात करण्यात आली असून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक 7/01/2022 रोजी पोलीस अधीक्षक बीड यांना माहिती मिळाली की मौजे सौदना (ता. अंबाजोगाई ) येथे गोविंद उद्रे हा त्याचे राहते घराच्या पाठीमागील पत्र्याचे शेड मध्ये गोवा, विमल, आर एम डी व इतर गुटख्याच्या मालास महाराष्ट्र राज्यात बदी असतांनाही तो चोरटी विक्री साठी आणून साठवून ठेवला आहे. सदर माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांना दिल्याने पंकज कुमावत यांनी पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे केज येथील सपोनि संतोसग मिसळे व उपविभागीय कार्यालयाचे स्टाफला पाठवून दोन्ही ठिकाणी रात्री 8 वाजता छापा मारला.
सदर ठिकाणी पत्र्याच्या शेड चे बाजूला एक इसम मिळून आला असता त्यास त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव गोविंद संदीपान उद्रे रा. सौंदाणा असे सांगितले. त्याचे घरामागील पत्र्याचे शेडची झडती घेतली असता सदर पत्र्याच्या शेडमध्ये गोवा, विमल, एक्का, स्टार गोल्ड, सितार, आर एम डी सुगंधित पान मसाला असा एकूण 329620 चा माल मिळून आला. सदर आरोपीस मुद्देमालासह पोलीस ठाणे परळी ग्रामीण येथे हजर करून बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष मिसळे, पोहेका बालाजी दराडे, पोना राजू वंजारे, दीलीप गिते, महादेव बहिरवाल, संजय टूले यांनी केली.