क्राइम

१८ वर्षीय युवतीचा विनयभंग, केज तालुक्यातील घटना…..! 

1 / 100
केज दि.९ – एका १८ वर्षीय युवतीचा घरात घुसून विनयभंग केल्याची घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
       केज तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय पीडित युवती ही इयत्ता १२ वीच्या वर्गात शिक्षण घेत असून तिचे वडील हे बाहेर राज्यात साखर कारखान्यावर स्थलांतरित आहेत. ८ जानेवारी रोजी तिची आई व मोठी बहीण या दोघी धारूरला नातेवाईकांकडे भेटण्यासाठी धारूरला गेली होती. सदर तरुणी व तिचा लहान भाऊ दोघेच घरी होते. त्यामुळे रात्री त्यांच्यासोबत आत्या मुक्कामी होत्या. ९ जानेवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास सदर युवती ही लहान भावास लघुशंकेसाठी घेऊन घराबाहेर आली असता दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अक्षय संतोष जंगम  हा घरात गेला. ही युवती घरात येताच अक्षय याने वाईट हेतुने हात धरून तु मला खुप आवडतेस, तु जर हो म्हणाली नाही तर तुझ्या भावाला मारुन टाकील अशी धमकी देत विनयभंग केला. तिने भावाला आवाज देऊन बोलावून घेतल्यानंतर त्याने अक्षयला धरण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्याच्या हाताला झटका देऊन घराबाहेर पळाला.
          दरम्यान,  त्यांनी बाहेर येऊन बघितले असता त्याचे सोबत बाहेर उभे असलेले दोन अनोळखी इसम ही शेजारी असलेल्या ज्वारीमध्ये पळुन गेले. अशी फिर्याद पीडित युवतीने दिल्यावरून अक्षय संतोष जंगम व इतर दोन अनोळखी इसम या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रुक्मिण पाचपिंडे  करीत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close