क्राइम
‘त्या’ महीलेला न्यायालयीन कोठडी…..!

केज दि.१० – ब्लॅकमेलिंग करून पैसे उकळण्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या महिलेस केज न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बीड जिल्ह्यातील केज, धारूर आणि युसूफवडगाव पोलीस ठाण्यात ब्लॅकमेलिंग च्या गुन्ह्यात केज पोलिसांच्या अटकेत असलेल्या महिलेस तिची पोलीस कोठडीची मुदत संपल्या नंतर केज पोलिसांनी केज न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दरम्यान धारूर आणि युसूफवडगाव पोलीस ठाण्यात तिच्यावर गुन्हे दाखल असल्याने चौकशीसाठी तिला पुन्हा ताब्यात घेतले जाऊ शकते. मात्र आता पर्यंत ‘ती’ महिला वगळता अद्याप इतर गुन्हेगार ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले नसून लवकरच इतर आरोपी ताब्यात घेतले जातील.