आरोग्य व शिक्षण

शाळांचे कुलूप उघडणार का……?

4 / 100

मुंबई दि.१२ – कोरोनाचा पुन्हा एकदा वाढता प्रादुर्भाव पाहता शाळांबाबत नवी नियमावली नुकतीच जाहीर करण्यात आली. पण एकीकडे कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत असताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचाही तोटा होत आहे.यामुळे राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. शाळा सुरु करण्याबाबत प्रस्ताव उद्याच सचिवांकडे पाठवणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले.

               बच्चू कडू यांनी एका कार्यक्रमात शाळा सुरु करण्याच्या निर्णयासंबधी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले ‘शाळाबंदीचा निर्णय तज्ज्ञांना विचारुनच घेतला आहे. आता तरीसुद्धा मी आयुक्तांशी बोललो, मुख्यमंत्र्यांशीही बोलणार आहे. शाळांबाबत स्थानिक प्रशासनावर निर्णय सोपवा, कलेक्टर, तहसीलदारांकडे निर्णय द्या, पालकांची संमती असेल तर शाळा सुरु करावी, असा प्रस्ताव आज किंवा उद्या मुख्य सचिवांकडे पाठवू, जिथे कोरोनाचा प्रभाव कमी आहे तिथे शाळा सुरु करता येतील का असा प्रस्ताव शिक्षण विभागामार्फत पाठवला जाईल असेही ते म्हणाले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close