आरोग्य व शिक्षण
होमिओपॅथी – एक आधुनिक चिकित्सापद्धत : डॉ.नंदिनी ठोंबरे
कोरोनासाठी प्रभावी असल्याचे मत
डी डी बनसोडे
June 10, 2020
होमिओपॅथी म्हणजे समचिकित्सा पद्धत. या पद्धतीचा शोध 1790 मध्ये जर्मनीचे डॉ. सॅम्युअल हनिमन यांनी लावला. डॉ.हनिमन यांनी अतिशय गरीब परिस्थितीतून आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि 1790 मध्ये MD डिग्री प्राप्त केली. शिक्षण चालू असताना वेगवेगळ्या पुस्तकांचे अनुवाद करून ते अर्थार्जन करत. क्यूलेन्स मटेरिया मेडिका नावाचे पुस्तकाचे अनुवादन करताना त्यांना विविध औषधी गुणधर्माचे ज्ञान प्राप्त झाले. त्याच पुस्तकात सिंकोना बार्क या झाडाची साल मलेरियावर गुणकारी असते असे समजले. परंतु पुस्तकात दिलेल्या स्पष्टीकरणावर त्यांचे समाधान झाले नाही. म्हणून त्यांनी स्वतः हे औषध 4 ड्राम दोन वेळा या प्रमाणात घ्यायला सुरुवात केली. हळूहळू त्यांना त्रास जाणवू लागला व सर्व मलेरियाची चिन्हे व लक्षणे त्यांना दिसू लागली. औषध बंद केल्यावर सर्व चिन्हे लक्षणे आपोआप नाहीशी झाली आणि त्यांनी हाच प्रयोग इतर सुदृढ व्यक्तींवर व स्वतःवर अभ्यासला व शेवटी असा निष्कर्ष काढला की निरोगी माणसात आजाराप्रमाणे लक्षणे निर्माण करणारी औषधे त्याच आजारात रुग्णाला दिल्यास ते औषध तो आजार बरा करू शकतात. संशोधनाच्या सहा वर्षानंतर 1796 साली त्यांनी होमिओपॅथीक चिकित्सा पद्धती व तत्त्वज्ञान जगासमोर मांडले.मात्र आपल्या अनमोल संशोधनानंतर 2 जुलै 1843 या दिवशी 89 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.
होमिओपॅथीचे तत्त्व
SIMILIA SIMILIBUS CURENTER म्हणजेच LIKE CURES LIKE हे होमिओपॅथीचे तत्त्व आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर काट्याने काटा काढणे. रोगांची लक्षणे, रुग्णाची लक्षणे, स्वभाव, आवडीनिवडी, शरीर रचना, वातावरणाचा शरीरावर होणारा परिणाम या सर्व गोष्टींचा रुग्णाच्या मनाबरोबर अभ्यास करून औषधी गुणांशी मिळते जुळते होमिओपॅथिक औषध रुग्णाला दिले जाते.
होमिओपॅथिक औषधे
ही औषधे वनस्पती, प्राणी व इतर संयुगां पासून बनवलेली असतात. त्यातील फक्त मुख्य कार्यकारी घटकच औषधी गुणधर्माचा असतो तोच औषध बनवताना वापरतात. औषध बनवतांना potentisation या पद्धतीचा वापर करतात व तयार झालेले औषध साठवून ठेवतात. कोणत्याही रोग्याला डायरेक्ट औषध न देता गोड चवीच्या साबुदाणा सारख्या गोळ्यांवर म्हणजेच globules वर टाकून औषध देतात. सद्यस्थितीत 5000 प्रकारची विविध क्षमतेची होमिओपॅथिक औषधी उपलब्ध आहे.
होमिओपॅथी व प्रतिकारशक्ती
होमिओपॅथीमध्ये शरीरातील प्रतिकार शक्तीला उत्तेजित केले जाते. यामुळेच या औषधी मुळे होणारा आजार कायमस्वरूपी बरा होतो. याशिवाय अनेक दीर्घकालीन व तात्पुरते दाबलेल्या आजारांचे ही समूळ उच्चाटन होते. सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणू संसर्गावर ही होमिओपॅथिक औषधे प्रभावशाली ठरली आहेत. यात देखील प्रतिकारशक्ती वाढून आजार टाळता येतो. होमिओपॅथीमध्ये प्रत्येक रोगी वेगळा आहे असे म्हणतात, म्हणजेच एकच आजार असणाऱ्या दोन व्यक्तींना ही सारखीच औषध दिले जात नाहीत . रोग, शरीर व मन सर्व गोष्टींचा विचार करून त्याला लागू पडेल अशी औषधे देतात.
आजारांमध्ये होमिओपॅथिक औषधे वापरावी
सध्या साध्या साध्या आजारांमध्ये ही अँटिबायोटिक्सचा अधिकाधिक वापर केला जातो. यामुळे बरीचशी अँटिबायोटिक्स या सूक्ष्म जीवांवर निकामी होत चालले आहे. शिवाय शरीरावर व मनावर विपरीत परिणाम दिसू लागला आहे. यामुळेच सुरक्षित औषधांची गरज निर्माण झाली आहे. होमिओपॅथिक औषधे ही गरज पूर्ण करतात.
अँटिबायोटिक्स अतिवापरामुळे, अन्नातून जाणाऱ्या विविध रसायनांमुळे, प्रदूषण ,वाढती चिंता ,बदललेली जीवनशैली, विविध ड्रग सेवन यांच्यामुळे शरीर पोखरले जाऊन प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणूनच खात्रीशीर औषधी म्हणून होमिओपॅथीकडे बघितले जाते. या औषधांना यूरोप आशिया व जगातील इतर भागातील अन्न व औषध प्रशासनाने मान्यता देऊन पूर्वीच सुरक्षित घोषित केले आहे. शिवाय जागतिक आरोग्य संघटना यांनी सुद्धा होमिओपॅथी ही जगात वापरात येणारे दुसरे वैद्यक शास्त्र आहे हे मान्य केले आहे.
खालील कारणांमुळे सुद्धा होमिओपॅथी सर्वोत्तम आहे.
सुरक्षित व बिनविषारी औषधी(safe & nontoxic),सर्वच आजारांवर काम करणारी कमीतकमी औषधी संयुगांचा वापर (minute dose ) आजाराचे समूळ उच्चाटन कमी खर्चिक. औषधे घेण्याची सोपी पद्धत (easy )यामुळे लहान मुलेसुद्धा आनंदाने या औषधे घेतात. घेतल्याबरोबर औषधे काम सुरू करतात (instant ) व्यक्तीच्या पर्सनॅलिटी मध्येसुद्धा आवश्यक तो बदल घडवून आणण्याची ताकद शरीरासोबत मनावरचा ही ताण कमी करणारी.(stress busters) खालील आजारांमध्ये होमिओपॅथिक औषधे वापरता येतात. विविध त्वचा विकार पिंपल्स ,सोरियासिस, सुरमा ,केस गळणे ,कोंडा, जुनाट डाग इ. स्त्रियांचे आजार वंध्यत्व, पाळीच्या सर्व तक्रारी, पांढरा पदर जाणे, ओटीपोटात दुखणे, स्तनांच्या तक्रारी, गरोदरपणातील विविध आजार. लहान मुलांचे आजार टॉन्सिल्स, बिछाना ओला करणे, माती खाणे, नखे खाणे, उलटी, अभ्यासात लक्ष न लागणे इत्यादी.
मानसिक आजार
झोप न येणे ताणतणाव चिडचिडेपणा इत्यादी@ बदलत्या जीवनशैलीमुळे झालेले आजार म्हणजेच स्थूलपणा अशक्तपणा ब्लडप्रेशर थायरॉइडचा आजार मधुमेह फिट्स येणे इत्यादी. किडनीचे विकार लघवी अडखळत होणे, मुतखडा, लघवी जळजळ होणे इत्यादी श्वसनसंस्थेचे आजार वारंवार सर्दी-खोकला होणे, दमा, बालदमा, सायनसायटिस. हाडांचे आजार संधिवात, हाडांचा ठिसूळपणा, हाड लवकर न जुळणे, हाड वेडेवाकडे जुळणे.
पोटाचे विकार
शौचास त्रास होणे ,पोट साफ न होणे, ॲसिडीटी, मुळव्याध ,भगंदर, लिवर सिरॉसिस इत्यादी इतर कुठल्याही जुनाट आजारांवर होमिओपॅथिक औषधे प्रभावशाली पणे काम करतात. त्या आजाराचे समूळ उच्चाटन करतात. वरील सर्व आजार व इतर कुठल्याही जुनाट आजार आणि इतर कुठल्याही जुनाट आजारांवर होमिओपॅथिक औषधे प्रभावी पणे काम करतात व त्या आजाराचे समूळ उच्चाटन करतात.