जवळबन येथील नितीन अरुण करपे या तरुणाची बहीण ही ११ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी जात होती. या रस्त्याने दुचाकीवरून चाललेल्या ज्ञानेश्वर उर्फ आण्णा दत्तात्रय धपाटे ( रा. भाटूंबा ता. केज ) याने दुचाकीचा कट मारला. हे समजल्यावर नितीन करपे याने बहिणीस दुचाकीचा कट का मारला अशी विचारणा करून शिवीगाळ करीत ज्ञानेश्वर यास लाथाबुक्याने मारहाण केली. त्याला जमिनीवर खाली पाडून डोक्यात दगड मारत डोके फोडले. अशी फिर्याद ज्ञानेश्वर धपाटे याने दिल्यावरून नितीन करपे याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास जमादार रंगनाथ राठोड हे करीत आहेत.