क्राइम
बेकायदेशीर कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या जनावरांचा कंटेनर ताब्यात, 39 लाखांचा मुद्देमाल जप्त…..!
केज दि.15 – एएसपी पंकज कुमावत यांच्या पथकाने मोठी कारवाई केली असून अवैध मार्गाने जनावरांची वाहतूक करणारा कंटेनर ताब्यात घेत सुमारे 39 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, दिनांक 14/01/2022 रोजी पोलीस अधीक्षक बीड यांना माहिती मिळाली की, कंटेनर क्रमांक KA 51AF9009 मध्ये नेकनूर येथील जनावरे भरून बेकायदेशीररित्या कत्तल करण्यासाठी तामिळनाडू राज्यात घेऊन जात आहे. सदरचा कंटेनरने नेकनुर येथून निघाला असून तो केज मार्गे जात आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना दिल्याने श्री. कुमावत यांनी पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे केज येथील सपोनि संतोष मिसळे व उपविभागीय कार्यालयाचे स्टाफला पाठवून सदरचे कंटेनर मसाजोग येथे दिनाक 15/1/20222 रोजी 01.00 वाजता थांबून कंटेनर ची पाहणी केली असता कंटेनर मध्ये एकूण 35 जनावरे बैल मिळून आली. सदर कंटेनर चालक व मालक यांना सदर बैलाचे कागदपत्र बाबत विचारणा केली असता जवळ नसल्याचे सांगितल्याने बैल व कंटेनर ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणून 35 बै, किंमत 14 लाख रुपये व कंटेनर 25 लाख असे एकूण 39 लाख रुपयांचा मुद्देमाल सह पाच आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे हजर करून बालाजी दराडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत केज यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष मिसळे पीएसआय मनोज कुलकर्णी,एएसआय शेषराव यादव, पोहेका बालाजी दराडे, सुहास जाधव, पोना राजू वंजारे, सचिन अहंकारे यांनी केली.