आरोग्य व शिक्षण

दहावी बारावी परिक्षेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले मत….……!

4 / 100

पुणे दि.15 – राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या ल रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील विविध भागांमध्ये  शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता दहावी बारावीच्या परीक्षा होणार का? परीक्षा झाल्यास त्या ऑनलाईन होणार की ऑफलाईन असे अनेक प्रश्न आता विद्यार्थ्यांसोबतच पालकांना देखील पडले आहे. यावर आता खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे  ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

परीक्षेसंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, दाहवी आणि बारावीच्या परीक्षा या व्हायलाच हव्यात, तसेच त्या ऑनलाईन घेऊन चालणार नाही. त्या ऑफलाईनच व्हायला हव्यात असे माझे मत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी काय निकाल लागला हे सर्वांनीच पाहिले. त्यामुळे गेल्या वर्षीची पुनावृत्ती टाळायची असेल तर परीक्षा या ऑफलाईनच घेतल्या जाव्यात असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

यावेळी बोलताना त्यांनी 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबत देखील माहिती दिली. राज्यात मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष: ग्रामीम भागांमध्ये लसीकरणाचे प्रमाण चांगले असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बुस्टर डोस देण्यात येत असून, बुस्टर डोस घेण्यासाठी पहिल्या डोसमध्ये 9 महिन्यांचे अंतर ठेवावे असे देखील यावेळी पवार म्हणाले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close